Advertisement

हिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा

हिरकणी चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. तर अक्षय कुमारचा हाऊसफुल ४ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

हिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा
SHARES

हिरकणी या मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने खळ्ळखट्टयाक करण्याचा इशारा दिला आहे. हिरकणी चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. तर अक्षय कुमारचा हाऊसफुल ४ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल ४ मुळे हिरकणी थिएटर मिळत नसल्याने मनसे स्टाइलमध्ये खळ्ळखट्टयाक करण्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. 

मनसे चित्रपट सेनेचे पदाधिकारी बुधवारी थिएटर मालकांना भेटणार आहेत. या बैठकीत तोडगा न निघाल्यास २४ आणि २५ ऑक्टोबरला खळ्ळखट्याक आंदोलन करू, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं, असा इशारा देण्यात आला आहे. 

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल यांची भूमिका असणार हाऊसफूल्ल ४ येत्या २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी हा मराठी चित्रपट २४ ऑक्टोबर प्रदर्शित होईल. मात्र, हिरकणीला थिएटर मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चित्रपट सेना संतप्त झाली आहे. यापूर्वीही मनसेने मराठी चित्रपटांना थिएटर आणि प्राईम टाइम मिळावा यासाठी आंदोलने केली आहेत.हेही वाचा  -

'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज

मराठीतील पहिला अॅक्शनपट 'बकाल'चा टीजर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा