मराठीतील पहिला अॅक्शनपट 'बकाल'चा टीजर प्रदर्शित

समीर आठल्ये दिग्दर्शित या चित्रपटात थरारक ॲक्शन्स, हृदयाचा ठोका चुकविणारे स्टंट्स आणि डान्स-म्युझिकची जबरदस्त ट्रीट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

SHARE

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट बकालचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. समीर आठल्ये दिग्दर्शित या चित्रपटात थरारक ॲक्शन्स, हृदयाचा ठोका चुकविणारे स्टंट्स आणि डान्स-म्युझिकची जबरदस्त ट्रीट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चैतन्य मिस्त्री आणि जुई बेंडखळे हे दोघं मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

विदर्भात बकाल नावाच्या एका समाजविघातक कारवाया करणाऱ्या टोळीचा एका समांतर सुरक्षा सेनेनं आश्चर्यकारकरित्या विनाश केला होता. या सत्यघटनेवर आधारीत बकाल चित्रपटाची कथा आहे. बकालच्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला चैतन्य मेस्त्री हा स्वत: ॲक्शन सीन्स आणि स्टंट्स करणारा पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार मिळाला आहे. तर एका पेक्षा एक या डान्स रिॲलिटी शो ची आणि मटा श्रावण क्वीन ह्या सौंदर्यस्पर्धेची उपविजेती ठरलेली ब्युटी विथ ब्रेन असलेली जुई बेंडखळेची डान्सिंग जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.


अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक आदी मातब्बर कलावंतांचा अभिनय ‘बकाल’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत बकाल हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.IRCTC च्या योजनेअंतर्गत 'हाऊसफुल ४'चं 'प्रमोशन ऑन व्हिल्स'


संबंधित विषय
ताज्या बातम्या