रेल्वेच्या महसुलात भर पडावी आणि अतिरिक्त कमावी व्हावी म्हणून रेल्वेनं एक आयडियाची कल्पना केली आहे. नवीन योजनेअंतर्गत जाहिरातींसाठी ट्रेन बुक करण्याचा उपक्रम रेल्वेनं सुरू केला आहे. या अंतर्गत आता कला, संस्कृती, चित्रपट, कार्यक्रम, क्रीडा इत्यादी गोष्टींच्या जाहिराती रेल्वेमध्ये करू शकता. पण यासाठी काही खासच रेल्वेच्या गाड्या असतील.
For promotion/publicity of Art, Culture,Cinema,TV, Sports etc.
— Western Railway (@WesternRly) October 15, 2019
,IR has come out with unique & novel initiative to publicise/promote campaigns through trains. 1st "Promotion on Wheels" Special Train will be run by IRCTC & Western Rly with Housefull 4 team to promote the film. pic.twitter.com/SmyIpNkfPY
रेल्वेनं आपल्या या उपक्रमाला 'प्रमोशन ऑन व्हील्स' असं नाव दिलं आहे. या योजनेचा श्री गणेशा बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनपासून झाला आहे. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारनं हाऊसफुल ४ या चित्रपटाच्या प्रमोशन विशेष ट्रेन बुक केली. या ट्रेनमध्ये 8 डबे आहेत. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेनं चालवलेली ही पहिली विशेष 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन असणार आहे. ही ट्रेन 'हाऊसफुल 4'च्या टीमच्या समन्वयानं बुधवारी मुंबई सेंट्रल इथून सुटली आणि गुरुवारी दिल्लीला पोहोचली.
Bala fever has reached the #HouseFull4Express 🔥🔥🔥 @Riteishd @thedeol @kritisanon @hegdepooja @kriti_official @ChunkyThePanday #HouseFull4 #SajidNadiadwala @NGEMovies @foxstarhindi pic.twitter.com/Lh2ZdUaaEb
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2019
ही ट्रेन महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमधून आणि महत्त्वपूर्ण जिल्ह्यात फिरणार. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी रेल्वेनं एफटीआर गाड्यांचा वापर करण्याची ऑफर दिली. या गाड्यांचं सर्व नियोजन आणि व्यवस्थापन आयआरसीटीसीकडे असणार आहे. आगामी येणाऱ्या चित्रपटांचे प्रमोशन देखील रेल्वेमार्फत करण्यासाठी, रेल्वेनं अनेक प्रॉडक्शन हाऊसला आधीच संपर्क साधला आहे.
हाऊसफुल ४ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमनं आयआरसीटीच्या ट्रेननं प्रवास केला. अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, किर्ती सेनन, चंकी पांडे आणि इतर स्टारकास्ट हजर होती. यावेळी त्यांनी जबरदस्त धम्माल केली. अक्षयनं तर रेल्वेत चहा कोण चांगला विकू शकतं याची स्पर्धा देखील घेतली. यात रितेश देशमुख आणि चंकी पांडेनं बाजी मारली.