आपण सर्व राजकुमार राव याला एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतो. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राजकुमार राव याला मात्र वेड आहे ते बाईक रायडिंगचं. नुकतीच त्यानं हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब ही बाईक खरेदी केली आहे. पण या बाईकची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
We welcome @RajkummarRao to the Harley-Davidson family, and we’re sure that he’s going to enjoy cruising the road on his Harley-Davidson Fat Bob™. #HarleyDavidson #HarleyDavidsonIndia pic.twitter.com/QFdttQePpj
— Harley-Davidson Ind (@HarleyIndia) October 14, 2019
राजकुमारनं हार्ले डेविडसन फॅट बॉब ही नवी बाइक खरेदी केली आहे. हार्ले डेव्हिडसन बाइकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी राजकुमार रावचा नव्या बाइकसोबतचा फोटो शेअर करत अभिनंदन केलं आहे. ‘राजकुमार रावचे हार्ले कुटुंबामध्ये स्वागत आहे आणि आम्हाला खात्री आहे की तू हार्ले डेविडसन फॅट बॉब बाइक राइड एन्जॉय करशील’ असे फोटो शेअर करत कॅप्शन दिली आहे. या बाइकची शोरुम किंमत १४ लाख ६९ हजार रुपये आहे. ही बाइक २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आली होती.
हार्लेच्या फॅट बॉब बाइकच्या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाइकमध्ये 1745 cc क्षमतेचे Milwaukee-Eight 107 इंजिन आहे. हे इंजिन 144Nm टॉर्क निर्माण करते. या बाइकचा ताशी वेग 180 Km आहे.
हेही वाचा