Advertisement

लॉस एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये मराठमोळा ‘बाबा’

बऱ्याच हिंदी सेलिब्रिटीजच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या ‘बाबा’ या मराठी सिनेमानं देश-विदेशातील सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आता लास एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्येही ‘बाबा’ चमकला आहे.

लॉस एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये मराठमोळा ‘बाबा’
SHARES

बऱ्याच हिंदी सेलिब्रिटीजच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या ‘बाबा’ या मराठी सिनेमानं देश-विदेशातील सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आता लाॅस एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्येही ‘बाबा’ चमकला आहे.

मूकबधीर असणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’साठी करण्यात आली आहे. मराठी चित्रपट कथेच्या दृष्टीनं खूपच श्रीमंत असतात. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’नं या क्षेत्रात पाऊल टाकलं ते अर्थपूर्ण कथेवर आधारित असलेल्या चित्रपटांची जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसाठी निर्मिती करण्याच्या उद्दिष्टानं. ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या आणि जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या त्यांच्या पहिला प्रादेशिक चित्रपटाच्या निर्मितीनंतर निर्मात्यांनी तरुण दिग्दर्शक राज गुप्ताला दिग्दर्शनात पदार्पण करताना बनवलेल्या ‘बाबा’ या चित्रपटाला पाठबळ दिलं.

या सिनेमाच्या निमित्तानं हिंदीतील अभिनेता दीपक दोब्रीयालनं मराठीत पदार्पण केलं आहे. याबाबत निर्मात्या आरती सुभेदार म्हणाल्या की, दीपक दोब्रीयाल यांच्या अत्यंत प्रतिभावान अशा अभिनयानं नटलेल्या आणि तेवढ्याच प्रतिभाशाली अशा नंदिता पाटकर व बालकलाकार आर्यन मेंघजी यांचा अभिनय असलेला व राज गुप्ता यांच्या तन-मन अर्पून दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झाली. आता आम्हाला या चित्रपटाच्या नामांकनाची प्रतीक्षा आहे. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ लवकरच अत्यंत गुणी कलाकार टीमसोबत तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.

‘बाबा’ला मिळालेल्या या यशाबाबत दीपक दोब्रीयाल म्हणाला की, ‘बाबा’ हा मला खूपच प्रिय असलेला चित्रपट आहे. चित्रपटाची कथा पहिल्यांदा मला ऐकवली गेली, तेव्हापासून तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा चित्रपट ठरला. अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करणं हे कोणत्याही कलाकारासाठी एक मोठी गोष्ट असते आणि चित्रपटातील माधवची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मनस्वी आनंद असल्याचंही दीपक म्हणाला.



हेही वाचा -

नव्या रुपात परतणार अक्कासाहेब

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा