नव्या रुपात परतणार अक्कासाहेब

काही कलाकारांनी साकालेल्या व्यक्तिरेखा इतक्या गाजतात की, ते पुन्हा परत यावेत असं प्रेक्षकांना वाटत असतं. अखेर प्रेक्षकांचा आग्रह लक्षात घेऊन कोणत्या ना कोणत्या रूपात ते परततात. अशाच अक्कासाहेबही सौंदर्याच्या रूपात परतणार आहेत.

  • नव्या रुपात परतणार अक्कासाहेब
  • नव्या रुपात परतणार अक्कासाहेब
SHARE

काही कलाकारांनी साकालेल्या व्यक्तिरेखा इतक्या गाजतात की, ते पुन्हा परत यावेत असं प्रेक्षकांना वाटत असतं. अखेर प्रेक्षकांचा आग्रह लक्षात घेऊन कोणत्या ना कोणत्या रूपात ते परततात. अशाच अक्कासाहेबही सौंदर्याच्या रूपात परतणार आहेत.

विविधांगी विषयांनी सजलेल्या मालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सुरू होणार आहे. सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे, तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन रंग माझा वेगळा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेद्वारे अक्कासाहेबांच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या हर्षदा खानविलकर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सौंदर्या इनामदार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून, हर्षदा यांचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

अक्कासाहेबांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर सौंदर्याच्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याबाबत हर्षदा म्हणाल्या की, या भूमिकेची मलाही खूप उत्सुकता आहे. पुढचं पाऊल या मालिकेनं माझं विश्वच बदलून टाकलं होतं. तीन वर्षांहून अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं, त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं आयुष्य नव्यानं सुरू होतंय असं म्हटलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणं वागणारी अशी सौंदर्या. पुढचं पाऊलच्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे.

याआधी पुढचं पाऊल या मालिकेमधील हर्षदा यांच्या अक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात अक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. ‘रंग माझा वेगळा’ या आगामी मालिकेमधील त्यांचा काहीसा लूकही हटके पहायला मिळणार आहे.हेही वाचा -

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?

या कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव
संबंधित विषय
ताज्या बातम्या