Advertisement

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?

‘टकाटक’ या अडल्ट कामेडी सिनेमानं मराठीला यशाचा एक नवीन मंत्र दिला आहे. ‘गर्ल्स’ या सिनेमातही ‘टकाटक’सारखंच काहीतरी बोल्ड पहायला मिळणार असं बोललं जात आहे. या सिनेमातील ‘मॅगी’चा टकाटक अंदाज दाखवणारं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?
SHARES

‘टकाटक’ या अॅडल्ट काॅमेडी सिनेमानं मराठीला यशाचा एक नवीन मंत्र दिला आहे. ‘गर्ल्स’ या सिनेमातही ‘टकाटक’सारखंच काहीतरी बोल्ड पहायला मिळणार असं बोललं जात आहे. या सिनेमातील ‘मॅगी’चा टकाटक अंदाज दाखवणारं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

काही दिवसांपूर्वी 'गर्ल्स' चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. 'मुलींची लहर, केला कहर' अशी टॅगलाईन असणाऱ्या या पोस्टरमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या 'या' मुली कोण, याकडं सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या आणि अखेर हे गुपित उलगडलं. गर्ल्स'मधील 'मती' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता 'मॅगी'सुद्धा प्रेक्षकांना भेटण्यासाठी आली आहे. केतकी नारायण या अभिनेत्रीनं यात 'मॅगी'ची भूमिका साकारली आहे. खरं तर या मॅगीला शोधण्यासाठी दिग्दर्शकांना खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांच्या म्हणण्यानुसार ‘गर्ल्स’च्या कथानकाला न्याय देणारी मॅगी मिळावी यासाठी खूप शोध घेण्यात आला.

या शोधाबाबत देवरुखकर म्हणाले की, मॅगीला शोधण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं. तेव्हा कुठं आम्हाला अपेक्षित मॅगी सापडली. ज्यावेळी आम्ही 'ही' व्यक्तिरेखा ठरवली त्यावेळी तिचं चित्र आमच्या डोक्यात पक्कं होतं, पण तशी मुलगी आम्हाला कुठेच सापडत नव्हती. अगदी सोशल मीडियावरही आम्ही तिचा शोध घेतला. अनेक मुली ऑडिशन्ससाठी येऊन गेल्या, तरीही मनासारखी मॅगी मिळतच नव्हती. ही शोधमोहीम सुरु असतानाच कुठूनतरी केतकीचा फोटो समोर आला. या भूमिकेसाठी केतकीनं ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची मॅगी सापडली.

केतकीची या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर काही काळ तिनं एक वर्कशॉप केलं. तिची आकलनक्षमता अफाट आहे. खरं तर बोल्ड भूमिका दिसायला जितकी सोपी दिसते, तितकी ती साकारणं कठीण असतं आणि हे आव्हान केतकीनं लीलया पेललं. ती मॅगीशी अगदी समरस झाल्याचं देवरुखकर यांचं म्हणणं आहे. प्रमुख भूमिका असलेला केतकीचा हा पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी तिनं 'युथ' या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये, शॉर्ट फिल्म्स मध्येही विविध भूमिका केल्या आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

मावळ्यांसह अवतरले जिजाऊ आणि शिवराय

मराठी सिनेमा झालाय 'तराट'
संबंधित विषय
Advertisement