Advertisement

मराठी सिनेमा झालाय 'तराट'

एखादा लेखक-दिग्दर्शक आपल्या सिनेमाला कोणतं शीर्षक देईल याचा नेम नाही. कथानकाचा चेहरा असणारं शीर्षक प्रथमदर्शनी रसिकांना आकर्षित करण्याचं काम करत असतं. आता ‘तराट’ नावाचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी सिनेमा झालाय 'तराट'
SHARES

एखादा लेखक-दिग्दर्शक आपल्या सिनेमाला कोणतं शीर्षक देईल याचा नेम नाही. कथानकाचा चेहरा असणारं शीर्षक प्रथमदर्शनी रसिकांना आकर्षित करण्याचं काम करत असतं. आता ‘तराट’ नावाचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवनवीन कथाविषयांमुळं मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य आलं असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हटके कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी या दोन गोष्टींच्या जोरावर आपलं वेगळंपण सिद्ध करणारा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तराट' या शीर्षकाप्रमाणंच वेगळेपण जपणारा हा मराठी चित्रपट रवी वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी दिग्दर्शित केला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निर्माते सागर भंडारे यांनी या चित्रपटाची पहिली झलक रसिकांच्या भेटीला आणली आहे.

वृंदावन एन्टरटेनमेन्ट अँड फिल्म्स निर्मित 'तराट'ची कथा रंगील गावामध्ये घडते. पाच मित्रांच्या उनाड मित्रांच्या अनुषंगानं खुलणारा 'तराट' हा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या तरुणवयातील खोडसाळ आठवणींना उजाळा देईल असल्याचं सांगितलं जात आहे. 'तराट' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद रवी वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी लिहिले आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळं या सिनेमात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळेल याबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे.हेही वाचा -

या मास्क मॅनचं रहस्य काय?

…आणि दगडी चाळीत अवतरले डॅडी
संबंधित विषय
Advertisement