या मास्क मॅनचं रहस्य काय?

मराठी सिनेसृष्टीत सध्या एका मास्क मॅननं दहशत पसरवली आहे. एका आगामी मराठी सिनेमात या मास्क मॅनचं रहस्य उलगडणार आहे.

SHARE

मराठी सिनेसृष्टीत सध्या एका मास्क मॅननं दहशत पसरवली आहे. एका आगामी मराठी सिनेमात या मास्क मॅनचं रहस्य उलगडणार आहे.

हिंदी-इंग्रजी सिनेमांमध्ये आपण बऱ्याचदा मास्क मॅन पाहिले आहेत. आता मराठी सिनेमालाही मास्क मॅनचे वेध लागले असून, हा मास्क मॅन मराठी रसिकांना आपल्या रहस्याच्या जाळ्यात अडकवणार आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागं कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे.

‘विक्की वेलिंगकर’ हा सिनेमा ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार हे प्रणय चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यानं या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत. ‘विक्की वेलिंगकर’चं दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतंच ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर प्रकाशित केलं आहे. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचं जाणवतं. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा अबाधित राहते. या मुखवट्यामागं नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेलं नाही.

या सिनेमाची कथा एका तरुणीवर आधारित असून, ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे. ती घड्याळे विकण्याचं काम करत असते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसं फारसं महत्त्व नसतं. या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक वळणं आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या