Advertisement

…आणि दगडी चाळीत अवतरले डॅडी

नवरात्रीतील नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणं फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले.

…आणि दगडी चाळीत अवतरले डॅडी
SHARES

वास्तवातील डॅडी कोण आहेत हे काहींना ठाऊक नसेल, पण दगडी चाळीतील आॅनस्क्रीन डॅडी मकरंद देशपांडे आहे हे सर्वांनाच माहित आहे. हेच डॅडी दगडी चाळीत अवतरले आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली.

नवरात्रीतील नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणं फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिलं असता 'डॅडीं'च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते. मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द 'डॅडी' असल्याचाच भास सर्वांना झाला.

मकरंद देशपांडे यांनीही 'डॅडीं'चं व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जायचं खरं तर खास निमित्त होतं. तिथं जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. 'दगडी चाळ २' या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या सिनेमात पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे करत आहेत, तर अमितराजचं संगीत लाभलं आहे.



हेही वाचा -

बिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा