Advertisement

बिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

बिग बाॅस शो तेरावं पर्व सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. हा शो बंद करण्यासाठी सोशल मीडियावरही #BanBiggBoss हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

बिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
SHARES

 वादात सापडून मोठा विरोध होत असलेला बिग बाॅस १३ हा रिअॅलिटी शो बंद करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. आता करणी सेनेनेही बिग बाॅस बंद करण्याची मागणी केली आहे. करणी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या शो वर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. बिग बाॅस १३ मुळे हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. 

बिग बाॅस शो तेरावं पर्व सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. हा शो बंद करण्यासाठी सोशल मीडियावरही #BanBiggBoss हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. सलमान खान या शो चं सूत्रसंचालन करत आहे. बिग बॉस १३ मध्ये BFF (बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर) ही नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांना त्यांच्या जोड्या निवडण्यास सांगण्यात आलं. या जोड्या एकाच बेडवर झोपणार आहेत. यामध्ये काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडलं. यालाच  प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. महिला व पुरुषाने एकाच बेडवर झोपणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे.  #BoycottBiggBoss हा हॅशटॅग वापरत अनेकांनी विरोध केला आहे.

 करणी सेनेनं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहीत हा शो बंद करावा अशी मागणी केली आहे. सूत्रसंचालक सलमान खानवरही कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. या शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्यात व हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात सलमानचाही मोठा वाटा आहे, असं या पत्रात करणी सेनेने म्हटलं आहे. हेही वाचा -

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

अजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग!
संबंधित विषय
Advertisement