Advertisement

अजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग!

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांपासून इतर नानाविध व्यक्तिरेखांच्या रूपात प्रेक्षकांना मोहिनी घालणारे अजय फणसेकर आणखी एक प्रयोगशील सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं शीर्षक आहे ‘सिनियर सिटीझन’ आहे.

अजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग!
SHARES

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांपासून इतर नानाविध व्यक्तिरेखांच्या रूपात प्रेक्षकांना मोहिनी घालणारे अजय फणसेकर आणखी एक प्रयोगशील सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं शीर्षक आहे ‘सिनियर सिटीझन’ आहे.

‘रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, ‘यही है जिंदगी’, ‘एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे नावीन्यपूर्ण विषयांनी सजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या अजय फणसेकर यांनी ‘सिनियर सिटीझन’ हा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, या फर्स्ट लूकमधूनच चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे. पाठमोरी सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लूक आहे. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याची जाणिव होते.

अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका असून, इतर काही महत्वपूर्ण कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. फणसेकर यांची दिग्दर्शक म्हणून आजवरची कामगिरी प्रयोगशील आणि लक्षणीय राहिली आहे. त्यामुळं 'सिनियर सिटिझन'मधून ते काय नवं सादर करतात, हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे, तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगनं काम पाहिलं आहे.



हेही वाचा -

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित

यामुळं सोनालीचं ‘जगनं झालं न्यारं…’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा