Advertisement

या कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव

काहीशी खोडकर आणि मस्तीखोर असलेल्या अभिनेत्री पर्ण पेठेच्या उपस्थितीमुळं सिनेमांपासून मालिकांपर्यंतच्या सेटवर नेहमीच खेळकर वातावरण असतं, याच स्वभावाचा फायदा घेत तिनं मराठीतील एका आघाडीच्या कलाकाराची फिरकी घेतली.

या कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव
SHARES

काहीशी खोडकर आणि मस्तीखोर असलेल्या अभिनेत्री पर्ण पेठेच्या उपस्थितीमुळं सिनेमांपासून मालिकांपर्यंतच्या सेटवर नेहमीच खेळकर वातावरण असतं, याच स्वभावाचा फायदा घेत तिनं मराठीतील एका आघाडीच्या कलाकाराची फिरकी घेतली.

आतापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी पर्ण सध्या ‘मीडियम स्पायसी’ या आगामी चित्रपटामुळं चर्चेत आहे. खोडकर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्णनं ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आपल्या सह-कलाकरांना आणि टीमला चांगलंच भंडावून सोडलं होतं अशी माहिती चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे. बऱ्याचदा तिच्या निशाण्यावर चित्रपटाचे क्रु मेंबर्स असायचे. शिवाय ललित प्रभाकरलासुद्धा पर्णच्या या प्रँन्क्सची चव चाखायला मिळाल्याचं कळतं.

असाच एक गमतीदार किस्सा चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला. एका दृश्यात ललितनं पर्णला उचलून घ्यायचं होतं. ललित तिला खाली ठेवत असताना तिचा पाय जोरात मुरगळला. तरीसुद्धा असह्य वेदना सहन करत तिनं चित्रीकरण सुरूच ठेवलं. या प्रकारानं ललितला खूप वाईट वाटलं, त्यानं पर्णला कुठलीही मदत लागल्यास देऊ केली. या वेळी पर्णनं सहजच आपली मेकअप रूम बरीच दूर असून तिथं आता कसं जायचं? अशी शंका उपस्थित केली. त्यावर ललितनं पर्णला तिच्या मेकअप रूमपर्यंत उचलून नेलं. पण, ज्या क्षणाला ललित तिथे पोहोचला आणि त्यानं पर्णला खाली ठेवलं, तसा संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ झाला. कारण, पर्ण आणि सागर देशमुख यांनी रचलेला हा एक प्रँन्क होता असं नंतर समोर आलं. सागरनं पर्णबरोबर पैज लावली होती की, ललित तिला उचलून मेकअप रूमपर्यंत घेऊन जाणार नाही.

ललित आणि पर्णसोबत या चित्रपटात सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत असून सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शीता, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची सहकलाकार म्हणून साथ लाभली आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित, लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल आहेत.



हेही वाचा -

मावळ्यांसह अवतरले जिजाऊ आणि शिवराय

हेही वाचा -

मावळ्यांसह अवतरले जिजाऊ आणि शिवराय

मराठी सिनेमा झालाय 'तराट'

मराठी सिनेमा झालाय 'तराट'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा