Advertisement

… आणि टाईमपास गर्लला मिळाला ‘गर्ल्स’

सध्या 'गर्ल्स' या आणखी एका बोल्ड सिनेमाचं पोस्टर्स गाजत आहेत. या सिनेमात एका लठ्ठ मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी अन्विता सध्या खूप चर्चेत आहे.

… आणि टाईमपास गर्लला मिळाला ‘गर्ल्स’
SHARES

सध्या 'गर्ल्स' या आणखी एका बोल्ड सिनेमाचं पोस्टर्स गाजत आहेत. या सिनेमात एका लठ्ठ मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी अन्विता सध्या खूप चर्चेत आहे.

गर्ल्स' या चित्रपटातील बोल्ड कॅरेक्टर पोस्टर लाँच झाल्यानंतर पोस्टरमधील तीन मुली हळूहळू प्रेक्षकांसमोर येऊ लागल्या आहेत. 'मती' आणि 'मॅगी' या दोन व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर 'रुमी' म्हणजेच अन्विता फलटणकर ही तिसरी 'गर्ल'ही समोर आली आहे. 'रुमी'चा शोध खरंतर पटकन लागला. याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले की, रुमीच्या भूमिकेसाठी आम्ही गोबरे गाल असणाऱ्या हेल्दी मुलीच्या शोधात होतो; परंतु ऑडिशन घेऊनही मनासारखी 'रुमी' सापडत नव्हती. तेव्हाच मला अन्विता आठवली. अन्विताचं 'टाईमपास'मधील काम मी पहिलं होतं. मी तिला ऑडिशनला बोलवलं आणि पहिल्याच फटक्यात 'रुमी'च्या भूमिकेसाठी तिची निवड केली. बाकीच्या दोन 'गर्ल्स'पेक्षा 'रुमी' आम्हाला सहज सापडली. माझ्या डोक्यात 'रुमी'ची जशी प्रतिमा होती तशीच अन्विता आहे. मुख्य म्हणजे 'रुमी'आणि अन्वितामध्ये खूप साम्य असल्यानं अन्वितालाही 'रुमी' साकारणं सोपं गेलं.

हृषिकेश कोळीनं या चित्रपटचं लेखन लेखन केलं आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिलं आहे.



हेही वाचा -

नव्या रुपात परतणार अक्कासाहेब

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा