संजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...

विधानसभा निवडणुंकीच्या प्रचाराने टोक गाठलेलं असताना बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

SHARE

विधानसभा निवडणुंकीच्या प्रचाराने टोक गाठलेलं असताना बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय दत्तचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संजय वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान करण्याचं आवाहन करत आहे.  

संजय दत्त या व्हिडिओत म्हणतोय की

आदित्य ठाकरे हा माझ्या लहान भावाप्रमाणे आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी खूप मदत केली आहे. ते माझ्या पित्यासमान आहे. त्यांनी मला केलेली मदत मी कधीही विसरु शकत नाही. तसंच उद्धवजी देखील माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. 

सध्या देशाला तरुण नेत्याची गरज आहे. आदित्य यांच्या रुपाने असा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहनही संजयने मतदारांना केलं आहे. हेही वाचा-

राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत

शिवसेनेचं वचन, देणार १० रुपयांत जेवण, १ रुपयांत आरोग्य सेवासंबंधित विषय
ताज्या बातम्या