Advertisement

'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज

चुलबुल रॉबिनहुड पांडे ने उत्साह को अधिक बढ़ाते हुए, दर्शकों को डेब्यू कलाकार सई एम मांजरेकर द्वारा अभिनीत खुशी से परिचित करवाया है जो इस फ़िल्म के साथ दबंग की खूबसूरत कास्ट का हिस्सा बनने जा रही हैं।

'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज
SHARES

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरनं 'दबंग ३' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'दबंग ३' चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून चुलबुल पांडेनेच तिचं स्वागत केलंय. सलमान खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सईच्या भूमिकेची ओळख करुन दिली आहे.

व्हिडीओत चुलबूल पांडे सईच्या फोटोकडे पाहत म्हणतो, ये है हमाई खुशी और इनकी खुशी के लिए हम किसीको भी दुखी कर सकते है.’ चित्रपटात सई चुलबूल पांडेच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘दबंग ३’ मध्ये महेश मांजरेकरसुद्धा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून सईसोबत ते स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे बापलेकीची जोडी पडद्यावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असून ‘दबंग’ फ्रँचाइजीमधला हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनव कश्यप तर दुसऱ्याचं अरबाज खाननं केलं होतं. या तिसऱ्या भागात विनोद खन्ना यांच्या भूमिकेची जागा प्रमोद खन्ना घेणार आहेत.

सलमान, सोनाक्षी, सईसोबतच चित्रपटात अरबाज, महेश मांजरेकर, डिंपल कपाडिया, माही गिल आणि कन्नड स्टार सुदीप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

मराठीतील पहिला अॅक्शनपट 'बकाल'चा टीजर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा