मुन्नाभाईमधल्या चिंकीची छोट्या पडद्यावर एन्ट्री

मुन्नाभाईमधल्या चिंकीची म्हणजेच ग्रेसी सिंगची लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री होणार आहे. अध्यात्मिक मालिकेच्या माध्यमातून टीव्ही क्षेत्रात पुनरागमन करमार आहे.

SHARE

लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या तुफान लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ग्रेसी सिंग आठवतेय का? अरे आठवत कशी नाही. ‘लगान’मध्ये गौरी आणि ‘मुन्नाभाई’मध्ये चिंकी या भूमिका साकारत ग्रेसी सिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण मोजकेच चित्रपट केल्यानंतर ती बॉलिवूडमधून गायबच झाली. मात्र पुन्हा एकदा ती आपल्या अभिनयाची जादू दाखवायला येत आहे. ग्रेसी एका मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. 

ग्रेसी लवकरच ‘संतोषी माँ-सुनाए व्रत कथाएं’ या मालिकेतून कलाविश्वात पुनरागमन करणार आहे. या मालिकेमध्ये ती संतोषी माँ ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. यापूर्वी संतोषी माताची भूमिका तिनं साकारली असून पुन्हा एकदा तिला संतोषी माता साकारण्याची संधी मिळत आहे. ही मालिका लवकरच प्रसारित होणार असून पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.हेही वाचा -

हिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा

'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या