आता ‘मुन्नी’ नाही, तर ‘मुन्ना’ होणार ‘बदनाम’?

सलमान खान सध्या ‘दबंग ३’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सलमान स्वत:च बदनाम मुन्ना बनल्याचं पाहायला मिळणार आहे.

मलाईकाची जागा सलमानकडं 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘दबंग’मधील ‘मुन्नी बदनाम हुई…’ हे गाजलेलं गाणं ‘दबंग ३’मध्ये रिक्रिएट केलं जाणार आहे. ‘मुन्नी बदनाम हुई…’मध्ये मलाईका अरोरानं मुन्नी बनून सलमानसोबत ठेका धरला होता. ‘दबंग ३’मध्ये परिस्थिती काहीशी बदललेली आहे. २०१० मध्ये जेव्हा ‘दबंग’ रिलीज झाला होता, तेव्हा मलाईका ही सलमानची वहिनी म्हणजेच अरबाज खानची पत्नी होती, पण आता अरबाज-मलाईकाचा घटस्फोट झालेला आहे. त्यामुळं या गाण्यातील मलाईकाची जागा सलमाननं स्वत:च घेतल्याचं माहिती मिळाली आहे.

 

गाण्यात ट्विस्ट

‘दबंग’चा निर्माता अरबाज खान आपल्या ‘दबंग ३’द्वारे बालिवुडला आणखी एक आयटम नंबर देण्याच्या तयारीत आहे. ‘दबंग २’मध्ये अरबाजनं करीना कपूरला घेऊन ‘फेव्हिकाल से…’ हे केलेलं आयटम नंबरही चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर ‘दबंग ३’ला पुन्हा ‘मुन्नी…’चा तडका देण्याचा त्याचा विचार होता, परंतु आता परिस्थिती बदलल्यानं त्यानं या गाण्यात ट्विस्ट आणलं आहे. त्यासाठी या गाण्यात बरेच चेंज करण्यात आल्याचं समजतं. हे गाणं आता सलमानवर चित्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं त्याचे बोलही बदलण्यात आले आहेत. त्यामुळं हे गाणं आता ‘मुन्नी बदनाम हुई…’ ऐवजी ‘मुन्ना बदनाम हुआ…’ असं होणार आहे.

 

पुन्हा सोनाक्षी सिन्हा 

या चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं माहेश्वर इथलं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आहे. यासोबतच टायटल ट्रॅकचंही शूट पूर्ण झालं आहे. सध्या सलमानला ‘भारत’चे वेध लागले असतील तरी आपला आवडता अभिनेता ‘दबंग ३’मध्ये ‘बदनाम मुन्ना’च्या रूपात कसा दिसेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली असेलच.


हेही वाचा-

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण


पुढील बातमी
इतर बातम्या