विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत मानुषी एका बायोपिकमध्ये पदार्पण करणार आहे.

  • विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
SHARE

'मिस वर्ल्ड २०१७' हा विश्वसुंदरी किताब पटकावणारी मानुषी छिल्लर आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत मानुषी एका बायोपिकमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर हे पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारीत बायोपिकमध्ये एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी करणार असून या चित्रपटाची निर्मीती यशराज बॅनर करत आहे.


राजकुमारी संयुक्ताची भूमिका

मानुषी चिल्लर या चित्रपटात राजकुमारी संयुक्ताची मुख्य भूमिका साकारणार आहे. सध्या मानुषी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय मानुषी अभिनय आणि डान्स वर्कशॉपमध्येही सहभागी होत असते. याआधी हरियाणाच्या मानुषी छिल्लरनं ५४ वा फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७ चा पुरस्कार मिळवला होत मानुषीनं दिल्लीतील सेंट थॉमस स्कूल आणि सोनीपत येथील भगत फूल सिंह गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर वुमन येथे शिक्षण घेतलं आहे.हेही वाचा -

विद्या बनणार 'शकुंतला देवी'

प्रतिक्षा सलमानच्या लग्नाच्या गाण्याची!
संबंधित विषय
ताज्या बातम्या