प्रतिक्षा सलमानच्या लग्नाच्या गाण्याची!

'भारत'चे निर्माते या चित्रपटातील तिसरं महत्त्वाचं गाणं रिलीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे गाणं लग्नाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान रील लाईफमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं पाहायला मिळेल.

SHARE

सलमान खानचा खूप मोठा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे, जो कायम त्याच्या चित्रपटांची आतुरतेनं वाटत पाहात असतो. यासोबतच या सर्वांना सलमानच्या लग्नाचेही वेध लागले आहेत, पण त्यापूर्वी सलमानच्या लग्नाचं गाणं त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


गाणं रिलीज होणार 

मागील काही दिवसांपासून सलमान 'भारत' या आगामी चित्रपटामुळं लाइमलाईटमध्ये आहे. एका मागोमाग एक 'भारत'मधील विविध लुक रिव्हील केल्यानंतर 'स्लो मोशन...' या दिशा पाटाणीसोबतच्या गाण्यानंही प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं आहे. आता या चित्रपटातील सलमानच्या लग्नाचं 'ऐथे आ...' हे गाणं रिलीज होणार आहे. या गाण्याच्या प्रदर्शनासाठी ९ मेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्यानं सलमानच्या चाहत्यांना जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही.


लग्नाच्या पार्श्वभूमीवर गाणं 

'भारत'चे निर्माते या चित्रपटातील तिसरं महत्त्वाचं गाणं रिलीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे गाणं लग्नाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान रील लाईफमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं पाहायला मिळेल. सलमाननंही सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. 'स्लो मोशन...' या गाण्यात दिशासोबत, तर 'चाशनी...'मध्ये कतरीनासोबतची सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.


 ५ जूनला प्रदर्शित

'भारत'च्या निमित्तानं सलमान-कतरीना ही जोडी पुन्हा एकत्र येणं ही दोघांच्याही चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं असून, सलमान-कतरीनासोबतचा त्यांचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात तब्बू, जॅकी श्रॅाफ, दिशा पटाणी, नीरा फतेही आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. अतुल अग्निहोत्रीच्या रील लाइफ प्रॅाडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि टी-सिरीजची निर्मिती असलेला हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा-

गदरचा सीक्वेल येणार

२० वर्षांनी पुन्हा सैफसोबत तब्बू!
संबंधित विषय
ताज्या बातम्या