गदरचा सीक्वेल येणार

१८ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटानं त्यावेळी २५० कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या सीक्वेलसाठी १५ वर्षांपासून काम सुरू आहे. चित्रपट जिथे संपला होता तिथूनच तो सुरु होणार आहे.

SHARE

'गदर : एक प्रेम कथा' २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल बनणार आहे. या सीक्वेलमध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेलनं मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता चर्चा आहे की, याचा सीक्वल बनणार आहे.


१५ वर्षांपासून काम सुरू

१८ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटानं त्यावेळी २५० कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या सीक्वेलसाठी १५ वर्षांपासून काम सुरू आहे. चित्रपट जिथे संपला होता तिथूनच तो सुरु होणार आहे. यात सनी, अमीषा पटेल आणि त्यांचा मुलगा जीत यांची गोष्ट असणार आहे. चित्रपटाच्या कथेला इंडिया पाकिस्तान अँगलनं पुढे नेलं जाईल.


जुनीच स्टारकास्ट

'गदर' च्या सीक्वेलमधे जुनीच स्टारकास्ट दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सनी आणि अमीषासोबत चर्चा केली गेली आहे. दोघांनी त्यावर अजून उत्तर दिलं नाही. तर चित्रपटात तारा सिंहचा मुलगा जीतचा रोल दिग्दर्शक अनिल यांचा मुलगा उत्कर्षनं केला होता. आता त्यांची इच्छा आहे की, या सीक्वेलमध्येही जीतच्या रूपात उत्कर्षच दिसावाहेही वाचा -

आयुषमान खुराना साकारणार ‘गे’ ची भूमिका

पळपुट्या नीरव मोदीवर बनणार वेब सिरीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या