Advertisement

पळपुट्या नीरव मोदीवर बनणार वेब सिरीज

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या आयुष्यातल्या अनेक गुपितांवरून आता पडदा उठणार आहे. कारण लवकरच त्याच्या जीवनावर आधारीत वेब सिरीज सुरू होणार आहे.

पळपुट्या नीरव मोदीवर बनणार वेब सिरीज
SHARES

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या आयुष्यातल्या अनेक गुपितांवरून आता पडदा उठणार आहे. कारण लवकरच त्याच्या जीवनावर आधारीत वेब सिरीज सुरू होणार आहे.


नाव गुपित

या वेब सिरीजचं दिग्दर्शन आणि निर्मिती प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर करणार आहे. अनेक मोठ्या कलाकारांचे पोर्टफोलियो बनवल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मात्याची जबाबदारी उचलली आहे. पण या फोटोग्राफर्सनं आपलं नाव गुपित ठेवलं आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा केल्यानंतर त्याच्या नावाचा खुलासा होणार.


२ आठवड्यात शूटिंग

वेब सिरीजमध्ये नीरव मोदी हिरे व्यापारी दाखवला असून बँकेची तो कशाप्रकारे फसवणूक करतो, हे दाखवण्यात येणार आहे. या वेब सिरीजवर सध्या काम सुरू आहे. पुढच्या दोन आठवड्यात वेब सिरीजचं शूटिंग शेड्युलनुसार सुरू करण्यात येईल. नीरव मोदीनं पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ७०० कोटी रुपयांचा चुना लावला होता. सध्या नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. भारतानं त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.हेही वाचा -

'सेक्रेड गेम्स २' चा टिझर प्रदर्शित, २ नव्या कलाकारांची इन्ट्री

आमीर खानच्या बहिणीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement