'सेक्रेड गेम्स २' चा टिझर प्रदर्शित, २ नव्या कलाकारांची इन्ट्री

पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडे मरताना दाखवला आहे. मात्र त्यानं एक गुपित लपवलेलं असतं. त्याचा शोध शैफ अली खान घेत असतो. ते गुपित नेमकं काय आहे?

SHARE

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्सची फर्स्ट ओरिजनल इंडियन सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. प्रेक्षकांना पहिली सीरिज इतकी आवडली की प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेनं प्रतीक्षा करू लागले. याच प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे ती म्हणजे ‘सेक्रेड गेम्स 2’चा टिझर प्रदर्शित झाला आहे.


कधी टेलिकास्ट ?

सेक्रेड गेम्स 2’ च्या या नव्या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी आणि कल्की केकला दिसत आहेत. अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’ मध्ये किती एपिसोड असणार? ते कधी टेलिकास्ट होणार? हे अजून उघड झालं नाही.


गुपिताचा शोध

२०१८ मध्ये या सीरिजचे पहिले सीझन आले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडे मरताना दाखवला आहे. मात्र त्यानं एक गुपित लपवलेलं असतं. त्याचा शोध शैफ अली खान घेत असतो. ते गुपित नेमकं काय आहे? याचा उलगडा सेक्रेड गेमच्या दुसऱ्या भागात होईल. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.हेही वाचा -

गुटख्याची जाहिरात करू नकोस, अजयला कॅन्सरग्रस्त चाहत्याची विनंती

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या