गुटख्याची जाहिरात करू नकोस, अजयला कॅन्सरग्रस्त चाहत्याची विनंती

प्रसिद्ध बाॅलिवूड अॅक्टर अजय देवगणच्या एका चाहत्याने अजयच्या जाहिरातीला भुलून गुटखा खाण्यास सुरूवात केली, खरी परंतु काही वर्षांनी त्याला कॅन्सरचं निदान झाल्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे यापुढं तंबाखूचा प्रचार होईल, अशी कुठलीही जाहिरात करू नये, अशी विनंतीच त्याने अजयला केली आहे.

SHARE

सिनेकलाकारांच्या प्रेमात आकुंठ बुडालेले, त्यांना देवत्व बहाल करून त्यांच्या नावानं मंदिर बांधणारे असंख्य भक्त आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येतात. या आंधळ्या प्रेमाची दखल सिनेकलाकार अपवादानेच घेताना दिसतात, तर काही वेळेस हा वेडेपणा चाहत्यांच्याही अंगलट येतो. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.


अजयला विनंती

प्रसिद्ध बाॅलिवूड अॅक्टर अजय देवगणच्या एका चाहत्याने अजयच्या जाहिरातीला भुलून गुटखा खाण्यास सुरूवात केली, खरी परंतु काही वर्षांनी त्याला कॅन्सरचं निदान झाल्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे यापुढं तंबाखूचा प्रचार होईल, अशी कुठलीही जाहिरात करू नये, अशी विनंतीच त्याने अजयला केली आहे.

नानकराम मीणा असं या कॅन्सरग्रस्ताचं नाव आहे. नानकराम अजयचे मोठे चाहते असून अजयची गुटख्याची जाहिरात बघून त्यांनीही गुटख्याचं सेवन सुरु केलं. परंतु काही वर्षांनी त्यांना कॅन्सर झाल्याचं कळाल्यावर त्यांना आपली चूक कळली.


पत्रकं वाटली

त्यानंतर त्यांनी जयपूरमधील सांगानेर, जगतपुरा आणि परिसरात १ हजार पत्रकं वाटली तसंच काही पत्रकं भिंतीवरही लावली. या पत्रकामध्ये तंबाखू, गुटख्याच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली असून कुटुंबावर ओढावलेलं संकटही नमूद करण्यात आलं आहे.


चुकीचा प्रभाव नको

या पत्रकात सर्वसामान्यांवर प्रभाव टाकणाऱ्या सिनेकलाकारांनी मद्य, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने अजय देवगणचा उल्लेखही केला आहे.

कॅन्सर होण्यापूर्वी नानकराम यांचं चहाचं दुकान होतं. परंतु कॅन्सर झाल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या दोन मुलांच्या मदतीने सांगानेर परिसरात दुध विकून कुटुंबाचा उदरर्निवाह करावा लागत आहे.हेही वाचा-

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र

'या' दिवशी प्रदर्शित होणार नरेंद्र मोदींचा बायोपिकसंबंधित विषय
ताज्या बातम्या