Advertisement

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र

आयुषमान म्हणाला की, भूमी आणि माझी विचार करण्याची पद्धत एकसारखीच आहे. त्यामुळे आमच्यात चांगलं जमतं. आमच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे, याचा मला आनंद आहे. पण यामुळे आता आमच्या दोघांवरील दबाव आणखी वाढला आहे.

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र
SHARES

'दम लगा के हईशा' आणि 'शुभ मंगल सावधान' यासारखे हिट चित्रपट देणारी जोडी आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. 'बाला' नावाच्या चित्रपटात ही जोडी मूख्य भूमिकेत दिसणार आहे. 'स्त्री' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक बाला चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे या जोडीच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.


दबाव वाढला

आयुषमान म्हणाला की, भूमी आणि माझी विचार करण्याची पद्धत एकसारखीच आहे. त्यामुळे आमच्यात चांगलं जमतं. आमच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे, याचा मला आनंद आहे. पण यामुळे आता आमच्या दोघांवरील दबाव आणखी वाढला आहे. यावेळी देखील आम्ही कमाल दाखवू आणि प्रेक्षकांना चित्रपटाची कथा देखील आवडेल, हा माझा विश्वास आहे.   भूमी एक चांगली कलाकार आहे. तिच्यासोबत काम करणं मजेशीर आहे. आमच्या जोडीनं प्रेक्षकांना काही तरी वेगळं दिलं आहे. यावेळी देखील आमचा तोच प्रयत्न असणार आहे.  


प्रेक्षकांची दाद

भूमी म्हणाली की, खऱ्या आयुष्यावर आधारीत चित्रपट करायला आयुषमान आणि मला आवडतं. आम्ही एकत्र काम करत असलेला हा तिसरा चित्रपट आहे. गेल्या दोन चित्रपटात आम्हाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. त्यामुळे बाला या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत.हेही वाचा

'या' दिवशी प्रदर्शित होणार नरेंद्र मोदींचा बायोपिक

'कुली नंबर १'चा पहिला पोस्टर रिलीज
संबंधित विषय
Advertisement