'कुली नंबर १'चा पहिला पोस्टर रिलीज


SHARE

वरुण धवननं आपला आगामी चित्रपट 'कुली नं.१'चा पहिला लुक आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. वरुणनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, ''१ मे पण पुढच्या वर्षी येणार 'कुली नं.1', असेल पूर्ण धमाल.'' वरूणनं या पोस्टसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन, मुख्य नायिका सारा अली खान, निर्माते वाशु भगनानी आणि बॅनर पुजा फिल्म्सला टॅग केलं आहे. 'कुली नं.१ हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.'


मजेदार आणि मनोरंजक 

काही दिवसांपूर्वी वरुणनं मीडियाशी बोलतांना सांगितलं की, 'जेव्हा मी गोविंदाचा कुली नं. 1 पाहिला होता तेव्हा अप्रतिम मनोरंजन झालं होतं. मी हा चित्रपट पाहताना चांगला वेळ घालवला आहे. हा चित्रपट सर्वात मजेदार आणि मनोरंजक चित्रपटांपैकी एक आहे. आम्ही या चित्रपटाला अडॉप्ट करत आहोत.'

कुली नं.१ चित्रपट ३० जून १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही डेव्हिड धवननं दिग्दर्शित केला होता. या कॉमेडी चित्रपटात गोविंदासोबत करिश्मा कपूर, कंचन, कादर खान आणि सदाशिव अमरापुरकर मुख्य भूमिकेत होते.
संबंधित विषय
ताज्या बातम्या