Advertisement

आमीर खानच्या बहिणीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनयापूर्वी निखतने निर्माती म्हणून काम केलं आहे. ९०च्या दशकात ‘तुम मेरे हो’ चित्रपटाची निर्मिती तिने केली होती. यात निखतनं आपल्या वडिलांसह सह-निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये ‘हम किसी से कम नही’ चित्रपटासाठी निखतनं कॉस्टयूम अस्सिटन्ट म्हणून काम केलं होतं.

आमीर खानच्या बहिणीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
SHARES

जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्प शूटर्सच्या जीवनावर आधारित ‘सांड की आंख’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची बहीण पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.


महाराणीची भूमिका 

‘सांड की आंख’ चित्रपटातून आमिर खानची बहीण निखत खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शूटर आजीच्या पात्रासह चित्रपटात आणखी काही पात्र देखील आहेत ज्यांना चित्रपटात महत्त्व देण्यात आलं आहे. त्यापैकीच एक भूमिका आमिर खानची बहीण निखत खान साकारणार आहे. या चित्रपटामध्ये निखत एका महाराणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र तिच्या भूमिकेविषयी अद्याप सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर संपूर्ण चित्रपटात तिची प्रमुख भूमिका असणार आहे. चित्रपटात तापसी आणि भूमीसह प्रकाश झा आणि विनीत सिंहदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.


निर्माती म्हणून काम 

अभिनयापूर्वी निखतने निर्माती म्हणून काम केलं आहे. ९०च्या दशकात ‘तुम मेरे हो’ चित्रपटाची निर्मिती तिने केली होती. यात निखतनं आपल्या वडिलांसह सह-निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये ‘हम किसी से कम नही’ चित्रपटासाठी निखतनं कॉस्टयूम अस्सिटन्ट म्हणून काम केलं होतं. संतोष हेगडे निखत खानचे पती असून निखतला श्रवण हेगडे आणि सेहर हेगडे अशी मुलं आहेत.



हेही वाचा -

'सेक्रेड गेम्स २' चा टिझर प्रदर्शित, २ नव्या कलाकारांची इन्ट्री

अक्षयसोबत अजय-रणवीर?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा