२० वर्षांनी पुन्हा सैफसोबत तब्बू!

दिग्दर्शक निशिकांत कामतचा 'दृश्यम', रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' आणि श्रीराम राघवन यांच्या 'अंधाधुन'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचं कौतुक झाल्यानंतर तब्बू आता काहीशा विनोदी अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं समजतं. 'जवानी जानेमन' या आगामी कॉमेडी चित्रपटात तब्बू एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

SHARE

सैफ अली खान आणि तब्बू यांनी आपल्या आजवरच्या करियरमध्ये बऱ्याच सहकलाकारांसोबत काम केलं आहे, पण 'हम साथ साथ है' या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री चांगलीच वर्क झाली होती. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी सैफ आणि तब्बू पुन्हा एकदा एकाच चित्रपटात झळकणार आहेत.


विनोदी अंदाजात

दिग्दर्शक निशिकांत कामतचा 'दृश्यम', रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' आणि श्रीराम राघवन यांच्या 'अंधाधुन'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचं कौतुक झाल्यानंतर तब्बू आता काहीशा विनोदी अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं समजतं. 'जवानी जानेमन' या आगामी कॉमेडी चित्रपटात तब्बू एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जॅकी भगनानीची पूजा एंटरटेन्मेंट, सैफ अली खानची ब्लॅक नाइट फिल्म आणि जय शेवक्रमणीच्या नॉर्दर्न लाइट्स फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कक्कड करणार आहेत.


'जवानी जानेमन'मध्ये एकत्र

अलिकडेच तब्बूही 'जवानी जानेमन'च्या टिमशी जोडली गेली आहे. यापूर्वी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्यांच्या 'हम साथ साथ है' या चित्रपटात सैफ आणि तब्बू यांनी एकत्र अभिनय केला होता. त्यापूर्वी पूजा एन्टरटेन्मेंटच्याच बॅनरखाली बनलेल्या दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या 'बीवी नं. १' मध्ये तब्बू मुख्य भूमिकेत होती, तर सैफनं यात कॅमिओ केला होता. आता 'जवानी जानेमन'मध्ये दोघेही कोणत्या प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसणार याबाबत सध्या तरी गुप्तता बाळगली जात आहे.


कॉमेडी चित्रपट

'जवानी जानेमन'चं शूटिंग जून महिन्यात सुरू होणार होणार असून, हा प्रवास खूपच रोमांचक असेल असं भगनानी यांचं म्हणणं आहे. हा एक मजेदार कॉमेडी चित्रपट आहे. आजच्या जनरेशनवर आधारित असलेल्या या चित्रपटात एक व्यक्ती आपल्या जीवनातील वास्तवतेचा कसा सामना करतो ते पाहायला मिळेल. पूजा बेदीची मुलगी अलाया या चित्रपटाद्वारे बॅालिवुडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचं ४५ दिवसांचं शूटिंग शेड्युल लंडनमध्ये होणार आहे.हेही वाचा -

गदरचा सीक्वेल येणार

पळपुट्या नीरव मोदीवर बनणार वेब सिरीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या