Advertisement

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही सध्याची रियल लाईफ हॅाट जोडी सर्वत्र गाजत आहे. या रिअल लाईफ कपलनं चित्रपटसृष्टीसोबतच जाहिरात विश्वातही बाजी मारली आहे.

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल
SHARES

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही सध्याची रियल लाईफ हॅाट जोडी सर्वत्र गाजत आहे. या रिअल लाईफ कपलनं चित्रपटसृष्टीसोबतच जाहिरात विश्वातही बाजी मारली आहे.


लोकप्रिय कपल

बॉलीवुडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टनुसार, सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच टीव्हीसी जगतातलं लोकप्रिय कपल बनलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट झालं आहे की, जाहिरात विश्वातल्या लोकप्रिय जोड्यांमध्ये रणवीर-दीपिका नंबर १, तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत. 


 १०० गुणांसह पहिल्या स्थानी 

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहिर केली आहे. रणवीर आणि दीपिका सध्या लॅायड्स एसी कमर्शियलमध्ये दिसत आहेत. लोकप्रियतेच्या चार्टवर  १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. या जोडी मागोमाग वरुण आणि आलिया ही जोड़ी प्रसिद्ध फ्रूटी अ‍ॅड कॅम्पेनमध्ये दिसून येत आहे. ही जोडी ८६.०२ गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. 


 रणवीर-आलिया

'गली बॉय' चित्रपटाची सुप्रसिध्द जोडी रणवीर-आलियानं बॉक्स ऑफिसच्या अगोदर अ‍ॅड वर्ल्डवर आपली जादू केली होती. मेक माय ट्रिपच्या सर्व अ‍ॅड्समध्ये दिसणाऱ्या रणवीर-आलियाची केमिस्ट्री गेले कित्येक महिने जाहिरात विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. ४८.७८ गुणांसह या जोडीनं तिसरं स्थान पटकावलं आहे.  रणबीर कपूर आणि दीपिका या जोडीनं नुकतीच एशियन पेंट्सची जाहिरात केली. १६.६६ गुणांसह ही जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. 


सर्वाधिक चर्चित कपल

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, रणवीर-दीपिका जोडीनं लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले. या दरम्यान दोघेही कायम चर्चेत राहिले. त्यामुळं हे बॉलीवुडमधलं सध्याचं सर्वाधिक चर्चित कपल बनलं आहे. त्यांची खूप मोठी फॅन फॉलोईंगही आहे. तसंच वरुण आणि आलियानं चार सिनेमे एकत्र केले आहेत. याशिवाय काही अ‍ॅड कॅम्पेनमध्येही एकत्र दिसले आहेत. मागील सहा वर्षांपासून ही बॉलीवूडची फेव्हरेट जोडी बनली आहे. वरूण-आलिया या जोडीचं तरूण पिढीसोबतच सर्वांमध्ये खूप क्रेझ आहे.



हेही वाचा- 

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

प्रतिक्षा सलमानच्या लग्नाच्या गाण्याची!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा