जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त ‘संजू’ चित्रपटानंतर आता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाॅलीवूडमधील दिग्गजांचा कित्ता गिरवत संजूबाबाही मराठीकडे वळला आहे.
मागील काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार-तंत्रज्ञांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावत आहे. सुभाष घई, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, संजय लीला भन्साळी यांसारख्या कलाकार-तंत्रज्ञांनी मराठी चित्रपटांची निर्मिती करीत इतरांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. याच वाटेने जात संजयनेही आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे.
संजयने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय होम प्रोडक्शनमध्ये एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. संजयने स्वत:च इन्स्टाग्रामवर क्लॅप बोर्डसोबत चित्रपटातील एका दृश्याचाही फोटो शेअर केला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्री नंदिता धुरी या फोटोत एका बालकलाकारासोबत दिसत आहे. त्यांच्या जोडीला हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दीपक डोबरियालही आहे.
या फोटोंसोबत संजयने संजयने लिहिलं आहे की, संजय दत्त प्रोडक्शनच्या बॅनरखाली पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती करत असल्याचं सांगताना खूप आनंद होत आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करीत असून, राज गुप्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. दीपक आणि नंदितासोबत या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी आणि आर्यन मेघ यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा -
लग्नाच्या बातमीमुळे दीपिका-रणवीर बनले नंबर वन!
‘मस्का’नंतर अनिकेत-प्रियदर्शन करणार धमाल!