Advertisement

‘मस्का’नंतर अनिकेत-प्रियदर्शन करणार धमाल!

अनिकेत आणि प्रियदर्शन या जोडगोळीचा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा नवा कोरा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘मस्का’नंतर अनिकेत-प्रियदर्शन करणार धमाल!
SHARES

काही दिवसांपूर्वीच लेखक-अभिनेता प्रियदर्शन जाधवने प्रेक्षकांना ‘मस्का’ लावत दिग्दर्शनातही पदार्पण केलं. प्रियदर्शनच्या या चित्रपटात अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत झळकला होता. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एकत्र आली आहे.


'या' चित्रपटातून दोघे एकत्र

अनिकेत आणि प्रियदर्शन या जोडगोळीचा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा नवा कोरा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रुपात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनिकेत-प्रियदर्शन ही नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरुनच यात काहीतरी धमाल दडल्याची चाहूल लागते. या चित्रपटात दोघेही एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत.


कधी येणार सिनेमा?

या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव रुईया यांनी केलं आहे. अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या चित्रपटात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा