SHARE

बॅालिवूडमधील सध्याची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कुणी विचारलं, तर क्षणर्धात कोणाच्याही मुखात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचंच नाव येईल. कारण सध्या सगळीकडे या दोघांचीच जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळेच इन्स्टाग्रामवर ही जोडी नंबर वन बनली आहे.


लग्नाची तारीख जाहीर

लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांतून येणाऱ्या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम देत दीपिका आणि रणवीर या दोघांनीही आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून जाहीर केली. यामुळे दोघांचीही इंस्टाग्रामवर सध्या दोघांचीही लोकप्रियता खूप वाढल्याचं दिसून येत आहे. 

बॅालिवूडकरांसोबतच दीपिका-रणवीरच्या चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. चाहत्यांच्या उत्सुकतेमुळेच दोघेही इन्स्टाग्रामवर नंबर वन पोझिशनवर पोहोचले आहेत.


लोकप्रियतेने उच्चांक गाठला

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार, दीपिका आणि रणवीरने १०० गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रस्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलिवूडमधल्या या बहुचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते. आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इन्स्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.


यामुळे रँकिंगवर फरक पडला

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, दीपिका-रणवीरने इन्स्टाग्रावरून आपल्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच लोकांनी ही पोस्ट वाचली, लाइक आणि शेअर केली. ज्यामुळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे. 

१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून गोळा केलेल्या या माहितीमध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. 


'या' रँकिंगमध्ये 'या' तारकांचंही नाव

रणवीरखेरीज अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुद्धा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. अभिनेत्रींबाबत बोलायचं तर दीपिकाखेरीज प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.


हेही वाचा - 

डिजीटल जगतात अनुष्का बनली नंबर वन!

संबंधित विषय
ताज्या बातम्या