Advertisement

डिजीटल जगतात अनुष्का बनली नंबर वन!

‘स्त्री’ सिनेमामुळे श्रध्दा कपूर डिजीटल जगतात नंबर वन अभिनेत्री बनली होती, पण आता अनुष्काने श्रध्दाला मागे टाकलं आहे. अनुष्का सध्या १०० गुणांसह नंबर वन स्थानी, तर श्रध्दा ८५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

डिजीटल जगतात अनुष्का बनली नंबर वन!
SHARES

‘सुई धागा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे मागील काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा भलतीच चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित होत असतानाच अनुष्काला याचा चांगलाच फायदा झाला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर अनुष्का नंबर वन बनली आहे.

श्रध्दाला मागे टाकलं 

‘स्त्री’ सिनेमामुळे श्रध्दा कपूर डिजीटल जगतात नंबर वन अभिनेत्री बनली होती, पण आता अनुष्काने श्रध्दाला मागे टाकलं आहे. अनुष्का सध्या १०० गुणांसह नंबर वन स्थानी, तर श्रध्दा ८५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ‘मनमर्जिया’ अॅक्ट्रेस तापसी पन्नू ७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी, दीपिका पदुकोण ६२ गुणांसह चौथ्या स्थानी, तर प्रियंका चोप्रा ५१ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी घोषित केली आहे.


सुई धागाचा फायदा

१४ भारतीय भाषांमधल्या ५०० हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहिलेल्या बातम्यांनुसार तारे-तारकांची लोकप्रियता समजते. गेल्या काही दिवसांमध्ये डिजीटल दुनियेत अनुष्काच्या मुलाखती, व्हिडीओ आर्टिकल आणि न्यूज सर्वाधिक दिसत होती. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सहसंस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार ‘सुई धागा’च्या प्रमोशनच्यावेळी अनुष्काच्या भूमिकेला धरून सोशल मीडिया आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर भरपूर मेम्स झाले. त्याचा फायदा अनुष्काला झाला आहे.



हेही वाचा -

‘रिंगण’ने पटकावले ५ फिल्मफेअर पुरस्कार

‘मोठी तिची सावली’ अशीच राहू दे- मीना मंगेशकर-खडीकर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा