Advertisement

‘रिंगण’ने पटकावले ५ फिल्मफेअर पुरस्कार

विधी कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘रिंगण’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, बालकलाकार, दिग्दर्शकीय पदार्पण, कथा आणि पार्श्वगायनासाठी असे एकूण ५ पुरस्कार पटकावले आहेत.

‘रिंगण’ने पटकावले ५ फिल्मफेअर पुरस्कार
SHARES

राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप सोडणाऱ्या दिग्दर्शक मकरंद मानेच्या ‘रिंगण’ या सिनेमाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही वर्चस्व गाजवलं. ‘रिंगण’ने एकूण ५ पुरस्कारांवर नाव कोरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.


कुठल्या पुरस्कारांचा समावेश?

विधी कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘रिंगण’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, बालकलाकार, दिग्दर्शकीय पदार्पण, कथा आणि पार्श्वगायनासाठी असे एकूण ५ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अॅवाॅर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि दिग्दर्शकीय पदार्पणासाठी व कथेसाठी मकरंद माने यांना गौरविण्यात आलं. आदर्श शिंदेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी सन्मानित करण्यात आलं.




१४ विभागांत नामांकने

'रिंगण' सिनेमाला एकूण १४ विभागांमध्ये नामांकनं जाहीर झाली होती. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी कल्याणी मुळे, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी दासू वैद्य आणि वैभव देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारासाठी अभिजित अब्दे, सर्वोत्कृष्ट संवादासाठी मकरंद माने, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी गांधार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी महावीर सब्बनवर यांचा समावेश होता. विविध पुरस्कार सोहळे आणि सिनेमहोत्सवांनंतर फिल्मफेअरमध्येही ‘रिंगण’ने नेत्रदीपक यश मिळवल्याने खूप आनंद झाल्याची भावना व्यक्त करत हे यश संपूर्ण टीमचं असल्याचं मकरंद म्हणाला.

नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यातील अंतिम नामांकन यादीत लॅन्डमार्क फिल्म्सला एकूण १६ नामांकनं प्राप्त झाली होती. ज्यात ‘गच्ची’ या सिनेमाच्या २ नामांकनाचाही समावेश आहे. ‘गच्ची’ सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रिया बापटला आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी मनोज मोचेमाडकर यांना नामांकन देण्यात आलं होतं.



हेही वाचा-

‘मोठी तिची सावली’ अशीच राहू दे- मीना मंगेशकर-खडीकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम लक्ष्मण यांना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा