दिपिका-रणवीर चढणार बोहल्यावर; १४,१५ नोव्हेंबरला रंगणार शाही विवाह सोहळा

रामलीला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दिपिका-रणवीरनं काही दिवसांपूर्वी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हापासून या दोघांचं लग्न नेमकं कधी होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलं होतं.

SHARE

अभिनेत्री दिपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांचं लग्न कधी होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. यांच्या लग्नाच्या तारखेवरून बराच खल सुरू होता. पण आता स्वत: दिपिका आणि रणवीरनं ट्विट करत लग्नाच्या मुहुर्तावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. या दोघांनी आपल्या लग्नाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १४ आणि १५ नोव्हेंबरला दिपिका आणि रणवीरच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडणार आहे. ट्विटरद्वारे या दोघांनीही ही माहिती दिली आहे.रणवीरचं रिट्विट 

रामलीला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दिपिका-रणवीरनं काही दिवसांपूर्वी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हापासून या दोघांचं लग्न नेमकं कधी होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर रविवारी दिपिकानं ट्विटरद्वारे १४ आणि १५ नोव्हेंबरला, दिवाळीनंतर आपण लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती दिली आहे. तर रणवीरनं दिपिकाच्या ट्विटला रिट्विट केलं आहे.


सुंदर प्रवासाला सुरूवात

आपल्याला आणि रणवीरला आपण जे प्रेम दिलं त्याबद्दल आभारी असल्याचं म्हणत दिपिकानं आता आपण प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या एका सुंदर नात्याच्या प्रवासाला सुरूवात करत आहोत. तेव्हा तुमचा आशार्वीद राहू द्या असं म्हणत आपल्या लग्नाचा मुहुर्त जाहीर केला आहे. तेव्हा दिवाळीनंतर दिपिका आणि रणवीरच्या लग्नाचा बार उडणार आणि हे लग्नही विशेष ठरणार. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या