कपिल म्हणतो, 'काहीतरी अॉथेंंटिसिटी ठेवा यार'!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • बॉलिवूड

२५ मार्च म्हणजेच रविवारपासून कपिल शर्माने त्याचा नवा कोरा करकरीत शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या त्याच्या नव्या शोची शो येण्याआधीच चर्चा सुरू झाली होती.

कपिलच्या शोच्या दुसऱ्या एपिसोडसाठी टायगर श्रॉफ शूट करणार होता. 'बागी २' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर कपिलच्या शो मध्ये हजेरी लावणार होता. पण हे शूट ऐनवेळी रद्द झालं, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पण आता कपिलने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्याने ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

 

कपिल म्हणतो, 'टायगर माझ्या दुसऱ्या शोच्या शुटींगसाठी येणारच नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबतचे शूट रद्द झाल्याचा प्रश्नच येत नाही. काही तरी अॉथेंटिसिटी ठेवा यार. ट्विटर काय आता केवळ स्पष्टीकरण आणि खुलासे यासाठी उरलं आहे. टायगर श्रॉफला 'बागी २' साठी खूप शुभेच्छा. लवकरच भेटू..'

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडण जगजाहीर आहे. 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या शोमध्ये त्याच्याबरोबर सुनील ग्रोवर नसणार आहे. सुनील ग्रोवर लवकरच क्रिकेटवरील कॉमेडी शो मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. हा कार्यक्रम हॉटस्टारवर प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सुनील ग्रोवरबरोबर बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेही सहभागी होणार आहे.

 


हेही वाचा

सुनीलला होती कपिलच्या फोनची प्रतीक्षा, आता दुसरा शो केला साईन

कपिल आपल्या शोची सुरूवात करणार अजयच्या 'रेड' पासून

पुढील बातमी
इतर बातम्या