कपिल आपल्या शोची सुरूवात करणार अजयच्या 'रेड' पासून

'सुपर डांन्सर २' हा रिअॅलिटी शोच्या जागेवर फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा हा शो सुरू करण्यात येईल. येत्या २५ मार्चपासून कपिलचा शो सुरू होऊ शकतो. अजयचा रेड हा चित्रपट १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

SHARE

विनोदाचा बादशहा कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकां हसवायला येत आहे. २०१७ हे वर्ष कपिलसाठी फारसं काही चांगलं नव्हतं. त्यामुळे नववर्षात एका वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे. सोनी वाहिनीवरूनच तो 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या शोच्या माध्यमातून परत येत आहे. कपिल आपल्या नव्या शो चे सुरूवात अजय देवगणच्या 'रेड' चित्रपटापासून करत आहे.


अजय देवगन आपल्या आगामी रेड चित्रपटाचे प्रमोशनसाठी कपिलच्या 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या कार्यक्रमात येणार आहे. नुकताच कपीलने अजय बरोबर एक प्रमोपण शूट केला आहे. या प्रमोत पाहूण्यांना अनेक तास वाट बघायला लावणार कपीलची अजय फिरकी घेतली आहे, अजय कपिलचे फोन उचलत नाहीये. आणि अखेर अजय कपिलच्या शो मध्ये यायला तयार होतो.


'सुपर डांन्सर २' हा रिअॅलिटी शोच्या जागेवर फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा हा शो सुरू करण्यात येईल. येत्या २५ मार्चपासून कपिलचा शो सुरू होऊ शकतो. अजयचा रेड हा चित्रपट १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अजय या कार्यक्रमात 'रेड' चित्रपटाचे पोस्ट प्रमोशन करेल. गेल्या वर्षी अजयचा 'बादशाहो' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजयने कपिलच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा या शोमध्ये हजेरी लावली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या