Advertisement

सुनीलला होती कपिलच्या फोनची प्रतीक्षा, आता दुसरा शो केला साईन


सुनीलला होती कपिलच्या फोनची प्रतीक्षा, आता दुसरा शो केला साईन
SHARES

कॉमेडिअन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडण जग जाहीर आहे. या दोघांच्या उत्कृष्ठ कॉमेडीमुळे या शोला सगळ्यात जास्त टीआरपी मिळाला होता. मात्र या दोघांमध्ये भांडण झालं आणि शो चा टीआरपी घसरला. त्यानंतर कपिल शर्मा आजारी पडला आणि हा शो बंद करावा लागला.
आता पुन्हा कपिल आपल्या फॅमिली टाइम विथ कपिल या नवीन कॉमेडी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या नवीन शो मध्ये सुनील ग्रोवर दिसेल, अशी आशा प्रेक्षकांना होती. मात्र तुमचा लाडका सुनील ग्रोवर आपल्याला या शो मध्ये दिसणार नाही. होय खुद्द सुनीलनेच हे जाहीर केलं आहे. त्याने याविषयी ट्विटरवरन माहिती दिली आहे. मात्र सुनील दुसऱ्या एका शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


काय म्हणाला सुनील?

सुनील म्हणाला, 'मला या शो मध्ये काम करण्याची इच्छा होती, मात्र मला कपिलकडून याविषयी कोणताही फोन आला नाही. मला कपिलकडून शो विषयी विचारणा करण्यासाठी कॉल येईल अशी अपेक्षा होती'

सुनीलच्या एका फॅनने त्याला सोशल मीडियावर कपिल बरोबर या नवीन शो मध्ये दिसणार का? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सुनील म्हणाला, 

 'तुमच्या प्रमाणे अनेकांनी मला याविषयी विचारले पण मला कपिलकडून कोणताच कॉल आला नाही. माझा फोन नंबरही तोच आहे. खूप दिवस वाट बघितल्यानंतर मी दुसरा शो साइन केला. प्रेक्षकांच्या मागणीमुळेच मी दुसरा एक चांगला प्रोजेक्ट सुरू करत आहे'.

त्यामुळे तुम्ही तुमचा गुलाटी कपिल फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा या शो मधून नाही, तर लवकरच एका वेगळ्या शो मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा