... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार

मागील काही वर्षांपासून अक्षय कुमार विविध भूमिकांच्या माध्यमातून देशभक्तीपर आधारित चित्रपटांमध्ये दिसत आहे. आता 'मिशन मंगल' या चित्रपटात तो एक साइंटिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

मंगळावर जाण्याचं मिशन 

'एक्सपिरीमेंट नही करेंगे, तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही...' अशा आशयाच्या अक्षय कुमारच्या मुखातील उत्कंठावर्धक संवादासह 'मिशन मंगल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षयच्या जोडीला विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, किर्ती कल्हारी, शरमन जोशी, संजय कपूर, मोहम्मद झशीन अयूब, दलिप ताहिल, शरत सक्सेना आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे. सुरेख ग्राफिक्सच्या सहाय्यानं या चित्रपटात भारतीयांचं मंगळावर जाण्याचं मिशन दाखवण्यात आल्याचं जाणवतं.

१५ आॅगस्टला प्रदर्शित

१५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मिशन मंगल'मध्ये नेमकं काय पहायला मिळेल त्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन म्हणजेच इस्रोनं आखलेल्या मंगळावर जाणाऱ्या मिशनची कथा या चित्रपटात आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, आर. बाल्की यांच्यासह अरुणा भाटिया, अनिल नायडू यांनी केली आहे. फॅाक्स स्टार स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात एका चुकीमुळं भारताचा स्पेस प्रोग्रॅम कशा प्रकारे पाच वर्ष मागे गेला होता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांवर मात करत भारतीय शास्त्रज्ञांनी जीवाचं रान करत कशा प्रकारे मंगळावर जाण्याचं मिशन फत्ते केलं त्याची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

https://youtu.be/q10nfS9V090


हेही वाचा -

संजय दत्तच्या मराठमोळ्या 'बाबा'चा ट्रेलर प्रदर्शित

छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत मृण्मयी सुपाळ


पुढील बातमी
इतर बातम्या