Advertisement

छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत मृण्मयी सुपाळ

प्रथमच छोट्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला जात आहे. या प्रवासात सध्या एक नवं पर्व सुरू झालं असून, छोट्या रमाबाईंची एंट्री होणार आहे.

छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत मृण्मयी सुपाळ
SHARES

प्रथमच छोट्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला जात आहे. या प्रवासात सध्या एक नवं पर्व सुरू झालं असून, छोट्या रमाबाईंची एंट्री होणार आहे.


नव्या सदस्याची भर

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून अवघ्या विश्वाला ठाऊक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं जीवनचरीत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेद्वारे घराघरात पोहोचत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मग ते रामजी बाबा असोत, भीवा असो मीरा आत्या, तुळसा वा जिजाबाई प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच कारणामुळं मालिकेतलं हे कुटुंब प्रत्येकालाच आपलंस वाटू लागलं आहे. या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याची भर पडणार आहे. 


बऱ्याच ऑडिशन्सनंतर निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत लवकरच छोट्या रमाची एण्ट्री होणार आहे. ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून सर्वांनाच लागली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. मृण्मयी सुपाळ बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे. याआधी मृण्मयी प्रेक्षकांना बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून भेटली आहे. रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणं तिच्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बऱ्याच ऑडिशन्सनंतर मृण्मयीची निवड करण्यात आली. आता या भूमिकेत मृण्मयी कसे रंग भरते ते पहायचं आहे.


महापुरुषाची सहचारिणी

रमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणं उभ्या राहिल्या. त्यासोबतच त्यांनी कुटुंबही उत्तमरीत्या सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेनं आणि प्रेमानं पाळलं. रमाबाईंचं बालपण साकारायला मिळण्याची संधी मृण्मयीला मिळाली आहे. मृण्मयी या भूमिकेसाठी सध्या खूप मेहनत घेत आहे. मालिकेतली बोलीभाषा आणि तेव्हाचा काळ उभा करण्यात मृण्मयीला मालिकेची संपूर्ण टीम मदत करत आहे.



हेही वाचा  -

कशावरून झाला माधव आणि हीनामध्ये वाद?

पुन्हा 'गंमत जंमत'मधील 'अश्विनी...'ची जादू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा