Advertisement

कशावरून झाला माधव आणि हीनामध्ये वाद?

बिग बॉसच्या घरात वाद होणं हे काही नवं नाही. आता या घरात माधव आणि हीना यांच्यामध्ये वाद झाला आहे. हीनाचा हरवलेला पाऊच कुणीतरी लपवून ठेवल्यानं दोघांमध्ये वाद झाला आहे.

कशावरून झाला माधव आणि हीनामध्ये वाद?
SHARES

बिग बॉसच्या घरात वाद होणं हे काही नवं नाही. आता या घरात माधव आणि हीना यांच्यामध्ये वाद झाला आहे. हीनाचा हरवलेला पाऊच कुणीतरी लपवून ठेवल्यानं दोघांमध्ये वाद झाला आहे.


मर्डर मिस्ट्री

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या 'मर्डर मिस्ट्री' हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या कार्यामध्ये सदस्याचा सांकेतिक खून करायचा आहे. ज्यानुसार काल किशोरी यांचा त्यांच्या परिवाराचे फोटोज स्विमिंग पूलमध्ये टाकून शिवने केला होता. या काहीशा अनोख्या आणि मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या टास्कमुळं बिग बॉसच्या घरात नवनवीन वाद होणार यात शंका नाही. त्यानुसार या टास्क दरम्यान हीना आणि माधवमध्ये वाद होताना दिसणार आहे. 


माधववर हीना चिडली

तसं पाहिलं तर नेहा, हीना आणि माधवमधील वाद संपायचं नावच घेत नाहीत. या तिघांमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल हीनानं नेहाला तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्यानं पाठवलेलं पत्र लपवलं ज्याबद्दल नेहाला काहीच माहिती नाही. यामध्ये नंतर विणानंही तिची साथ दिली. त्यामुळं माधववर हीना चिडली आहे. कारण, हीनाचा हरवलेला पाऊच कुणीतरी लपवून ठेवला आहे आणि ते तिला समजलं आहे. तिला वाटत आहे कि माधवने तो लपवला आहे. या गैरसमजातून दोघांमध्ये वाद भडकला आहे.


माझी विकेट जाईल

माधवला हीना तावातावात म्हणाली की, तू इकडे ये मला तो पाऊच काढून दे. त्यावर माधव म्हणाला की, मी हात नाही लावणार माझी विकेट जाईल. माधवचं म्हणणं आहे की, तो पाऊच मिळाला ना तुला हरवला नाही ना. त्यावर हीनानं माधवला विचारलं कोणी केलं ते? त्यावर माधव तिला म्हणाला की, तू एपिसोड नंतर कॅमेरामध्ये फुटेज बघ. त्यावर हीना त्याच्यावर अजूनच चिडली. त्यानंतर माधव म्हणाला की, आम्हाला काय माहिती कोणी लपवला? कोणी ठेवला? त्यावर हीनाचं म्हणणे होतं की, तिथे पण कोणीतरी काहीतरी लिहलेलं आहे ते कोणी लिहिलं?


खरा चोर कोण?

यावर माधवचा पारा खूपच चढला आणि तो हीनाला म्हणाला की, माझ्या नादी लागू नकोस, माझ्याशी वाद नको घालूस. मी काहीच नाही केलं. हे बोलत असताना माधवचा आवाज अचानक चढला. माधव हीनाला म्हणाला की, तू स्वत:च लिहिलं असशील. तूच बसली आहेस इथे आणि तूच लपवून ठेवलास तो पाऊच तिकडे. या वादातून काय निष्पन्न होतं? खरा चोर कोण आहे? तो समोर येतो का? या प्रश्नांची उत्तरं येत्या भागात पहायला मिळणार आहे.हेही वाचा  -

पुन्हा 'गंमत जंमत'मधील 'अश्विनी...'ची जादू
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा