Advertisement

पुन्हा 'गंमत जंमत'मधील 'अश्विनी...'ची जादू

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंमत जंमत' या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' या गाण्याची मोहिनी आजही कमी झालेली नाही. जवळपास ३२ वर्षांनी रसिकांना पुन्हा एकदा या गाण्याची जादू अनुभवायला मिळणार आहे.

पुन्हा 'गंमत जंमत'मधील 'अश्विनी...'ची जादू
SHARES

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंमत जंमत' या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' या गाण्याची मोहिनी आजही कमी झालेली नाही. जवळपास ३२ वर्षांनी रसिकांना पुन्हा एकदा या गाण्याची जादू अनुभवायला मिळणार आहे.


म्युझिक लाँच

मागच्या वर्षी सुरुवातीलाच बॅाक्स आॅफिसवर पैशांचा पाऊस पाडणाऱ्या 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचा सिक्वेल 'ये रे ये रे पैसा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे अजरामर गीत अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात रिमोल्ड करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या सोहळ्यात 'ये रे ये रे पैसा २'चं म्युझिक लाँच करण्यात आलं. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर उपस्थित होते. 'अश्विनी ये ना...' या धमाकेदार गाण्यासह आणखी दोन गाणी या चित्रपटात आहेत. 


३२ वर्षांपूर्वीच्या आठवणी 

'अश्विनी ये ना...' या नव्या रंगरुपातल्या गाण्याविषयी अशोक सराफ आणि चारुशीला साबळे म्हणाले की, हे गाणं ऐकून ३२ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. हे गाणं त्यावेळी ज्या पद्धतीनं केलं, त्याचा ताल, चाल यासाठी संगीतकार अरूण पौडवाल यांना सलाम आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं  होतं. मराठी चित्रपट संगीतातलं हे माईलस्टोन गाणं आहे. सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यातल्या स्टेप्स बसवल्या होत्या. हे गाणं चित्रीत करताना मजा आली होती. जवळपास एकाच टेकमध्ये प्रत्येक स्टेप ओके झाली होती. त्यावेळी हे गाणं इतकं लोकप्रिय होईल असं वाटलं ही नव्हतं. या गाण्यानं खूप लोकप्रियता दिली.


किशोर कुमार यांची अट

या ओरीजनल गाण्याचा नृत्यदिग्दर्शक चित्रीकरणाच्या दिवशी न आल्यानं आयत्यावेळी गरज म्हणून या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केल्याची आठवण सचिन पिळगांवकर यांनी सांगितली. याशिवाय किशोर कुमार यांना कशाप्रकारे प्रथमच मराठी गाण्यासाठी तयार करण्यात आलं, त्यानंतर किशोर कुमार यांनी सांगितलेल्या अटींवर कवी शांताराम नांदगावकर यांनी च आणि ळ शब्दांचा वापर न करता हे गाणं शब्दबद्ध केलं आणि कशा प्रकारे ते चित्रीत करण्यात आलं हे सारं काही सांगताना पिळगावकर अनाहुतपणे उपस्थितांना जणू 'गंमत जंमत'च्या सेटवरच घेऊन गेले.


९ ऑगस्टला प्रदर्शित

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांना छायांकन, फैसल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनाल नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल-संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक अवधूत आणि मुग्धा यांच्यासोबत शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनीही या चित्रपटासाठी गायन केलं आहे.९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

https://youtu.be/Ae20j7iON7Uहेही वाचा  -

नेहाची कविता 'खेळ अजूनही बाकी आहे....'

तीन दिवसांत ५० कोटींची 'सुपर' भरारी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा