Advertisement

तीन दिवसांत ५० कोटींची 'सुपर' भरारी

काही चित्रपट पहिल्या दिवशी जास्त बिझनेस करत नाहीत, पण नंतर हळूहळू या चित्रपटांचा बिझनेस वाढू लागतो. ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या 'सुपर ३०' या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्ये ५० कोटी रुपयांची कमाई करत बॅाक्स आॅफिसवर 'सुपर भरारी' घेतली आहे.

तीन दिवसांत ५० कोटींची 'सुपर' भरारी
SHARES

काही चित्रपट पहिल्या दिवशी जास्त बिझनेस करत नाहीत, पण नंतर हळूहळू या चित्रपटांचा बिझनेस वाढू लागतो. ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या 'सुपर ३०' या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्ये ५० कोटी रुपयांची कमाई करत बॅाक्स आॅफिसवर 'सुपर भरारी' घेतली आहे.


धडाकेबाज यश 

दिग्दर्शक विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'सुपर ३०' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यश मिळवल्याचं चित्रं तिकीटबारीवर पहायला मिळत आहे. गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्ये धडाकेबाज यश मिळवत हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक सुपरहिट चित्रपट देण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. चित्रपट समीक्षकांसोबतच फर्स्ट डे फर्स्ट शो 'सुपर ३०' पहिलेल्या प्रेक्षकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांनी या चित्रपटाची पुढील वाटचाल सोपी केल्याचं चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचं मत आहे.


व्यवसायाचा आलेख चढता

आजच्या काळात फर्स्ट डे फर्स्ट शोच्या बिझनेसवर त्या चित्रपटाचं पहिल्या वीकेंडचं भविष्य ठरवलं जातं, पण 'सुपर ३०'बाबत काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांची फारशी गर्दी पहायला मिळाली नसली तरी शुक्रवार संध्याकाळपासून शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांनी गर्दी केल्यानं या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यश मिळवलं आहे. मेट्रो आणि टायर-२ सिटीजमधील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांसोबतच एकेरी चित्रपटगृहांमध्येही या चित्रपटाच्या व्यवसायाचा आलेख चढता असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.


अशी झाली कमाई

पहिल्या दिवशी शुक्रवारी 'सुपर ३०'नं ११.८३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या व्यवसायात भरघोस वाढ झाल्यानं हा आकडा १८.१९ कोटींपर्यंत पोहोचला. रविवार सुट्टीच्या दिवशी पहिल्या शो पासूनच हा चित्रपट पाहण्यासाठी बहुतांश प्रेक्षकांनी आपल्या मुलांसोबत गर्दी केली. याच बळावर शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी २०.७४ कोटी रुपयांची कमाई केलं. त्यामुळं तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत 'सुपर ३०'च्या खात्यात जवळजवळ ५०.७६ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.


दमदार अभिनय

ऋतिक रोशनचा दमदार अभिनय, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा चित्रपट आणि गरीब मुलांनी आयआयटी कशी क्रॅक केली याबाबत जाणून घेण्याच्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेनं या चित्रपटाला यशाचा मार्ग दाखवला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेले 'कबीर सिंग' आणि 'आर्टिकल १५' हे दोन चित्रपट बॅाक्स आॅफिसवर चांगली कमाई करत असताना 'सुपर ३०'ने आपली स्वत:ची वेगळी जागा निर्माण करत मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगं आहे. खरं तर ऋतिकसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ऋतिकच्या 'मोहें जो दारो' आणि 'काबील'च्या तुलनेत 'सुपर ३०' ला मिळालेलं यश खूप मोठं असल्याचं मानलं जात आहे. पुढल्या शुक्रवारी फार मोठे चित्रपट प्रदर्शित न होण्याचा फायदाही 'सुपर ३०'ला मिळेल असा अंदाज चित्रपट व्यवसायतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.हेही वाचा -

मेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'

कोण बनणार कॅप्टन? रुपाली की वीणा?
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा