Advertisement

मेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'

मराठी चित्रपटांचा दर्जा आणि आशय देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांना नेहमीच खुणावत असतो. अशाच प्रकारचा विषय असलेला 'स्माईल प्लीज' हा मराठी चित्रपट इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नमध्ये पोहोचला आहे.

मेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'
SHARES

मराठी चित्रपटांचा दर्जा आणि आशय देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांना नेहमीच खुणावत असतो. अशाच प्रकारचा विषय असलेला 'स्माईल प्लीज' हा मराठी चित्रपट इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नमध्ये पोहोचला आहे.


१९ जुलै रोजी प्रदर्शित

'हृदयांतर' या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं फॅशन डिझायनिंगकडून चित्रपट दिग्दर्शनाकडं वळलेल्या विक्रम फडणीसनं 'स्माईल प्लीज'च्या रूपात आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात त्यानं मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर या दोन कलाकारांसोबेतच प्रसाद ओक या मराठीतील कसलेल्या अभिनेत्यालाही एकाच चित्रपटात एकत्र आणण्याची किमया साधली आहे. १९ जुलै रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असलेल्या या चित्रपटानं थेट विदेश भरारी घेत मेलबर्नमध्ये हजेरी लावण्याचा मान मिळवला आहे.


प्रेरणास्रोत ठरणारा चित्रपट

'स्माईल प्लीज' या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. जगण्याला आणि स्वप्नांना खऱ्या अर्थानं नवीन परिभाषा देणारा हा चित्रपट सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरणारा असल्याचं टीमच्या वतीनं सांगितलं जात आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेलबर्नमधील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाल्यानं 'स्माईल प्लीज' देशभरातील उत्कृष्ट दर्जाच्या, उत्तम आणि आगळेवेगळे विषय, कथानक असणाऱ्या चित्रपटांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे. अनेक चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड या फेस्टिवलसाठी केली जाते. 


शाहरुखच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सच्या स्टारडमचा स्पर्श झाल्यानं 'स्माईल प्लीज' मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच किंग खान अर्थात शाहरुख खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला भरपूर प्रतिसाद लाभला. त्यामुळं या चित्रपटाबद्दल जनमानसात उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील गाणीही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मंदार चोळकरनं या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. नृत्यदिग्दर्शनाची धुरा बॉस्को-सिझर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात मुक्ता, प्रसाद आणि ललितसोबत अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



हेही वाचा-

Movie Review : व्हॅाट्सअपवर रंगलेल्या प्रेमाचा फसवा डाव

Movie Review : राजा घडवणाऱ्या गणितातील सुपरहिरोची 'सुपर' कहाणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा