Advertisement

संजय दत्तच्या मराठमोळ्या 'बाबा'चा ट्रेलर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीत संजूबाबा या नावानं ओळखला जाणारा संजय दत्तही आता मराठी चित्रपटांकडे वळल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. संजयनं आपली पहिली मराठी निर्मिती असलेल्या 'बाबा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत संजूबाबा या नावानं ओळखला जाणारा संजय दत्तही आता मराठी चित्रपटांकडे वळल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. संजयनं आपली पहिली मराठी निर्मिती असलेल्या 'बाबा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.


२ ऑगस्टला प्रदर्शित

बॅालीवूडमधील बऱ्याच दिग्गजांपाठोपाठ संजय दत्तही मराठी चित्रपट निर्मितीकडं वळला आहे. त्यानं 'बाबा' या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक आगळंवेगळं भावविश्व चितारणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर संजयनं पत्नी मान्यताच्या उपस्थितीत स्वहस्ते लाँच केला. जुहू येथील पीव्हीआर सिनेमाज येथे पार पडलेल्या या सोहळ्याला संजय-मान्यतासोबत दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी, दिग्दर्शक राज आर गुप्ता आणि अशोक सुभेदार यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा चित्रपट आगळ्या अशा कथेवर तर बेतलेला आहेच, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड लाभली असल्याच्या पाऊलखुणा या ट्रेलरच्या माध्यमातून उमटतात. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


कुटुंबाची कथा

या चित्रपटाची दुसरी खासियत म्हणजे आजवर हिंदीत 'तनु वेड्स मनू'सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसलेला दिपक दोब्रीयाल या चित्रपटाच्या निमित्तानं मराठीकडं वळला आहे. 'बाबा'मध्ये त्यानं शीर्षक भूमिका साकारत कमालीचा अभिनय केल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळतं. केवळ कमर्शियल चित्रपटांपुरताच मर्यादित न राहता आशयघन चित्रपटांमध्येही आपण तितक्याच ताकदीनं काम करू शकतो याची झलकच दिपकनं 'बाबा'च्या ट्रेलरमध्ये दाखवली आहे. एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. या चित्रपटात नंदिता पाटकरनं दिपकच्या पत्नीची भूमिका साकारली असून, बालकलाकार आर्यन मेंघजी त्यांचा मुलगा बनला आहे.


 सोशल मीडियावर प्रतिसाद

चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सबरोबर अशोक आणि आरती सुभेदार यांच्या ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभत आहे. 'अडगुलं मडगुलं...' या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. राज आर. गुप्ता या नवोदित दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, कैलास वाघमारे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Z2AFe3krvZQ



हेही वाचा  -

कशावरून झाला माधव आणि हीनामध्ये वाद?

पुन्हा 'गंमत जंमत'मधील 'अश्विनी...'ची जादू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा