टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हॅक्ड हे हिनाच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याचदिवशी हिनाचा वाढदिवस असतो.
हिनानं चित्रपटातील तिची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या पोस्टमध्ये तिनं चित्रपट ३१ जानेवारीला २०२० ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. चित्रपटात डिजिटल आणि सोशल मीडियाच्या निगेटिव्ह बाजूवर भाष्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा