Advertisement

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये जब्बार पटेल यांनी बाजी मारली.

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये जब्बार पटेल यांनी बाजी मारली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांनी निवड झाल्याची घोषणा केली. नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीत डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांच्या अर्जांवर चर्चा झाली. यावेळी पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली.  नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जब्बार पटेल यांना अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे प्रतिष्ठित विष्णुदास भावे पदकाने तसंच दिल्लीतील संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. जैत रे जैत, मुक्ता, सामना, सिंहासन आदी चित्रपट आणि नाटकांचं दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केलं आहे.  राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्था स्थापन केली आहे.हेही वाचा  -

सुजॉय घोषच्या 'कहानी ३’ची स्टोरी आधीच लिक, पण 'हा' आहे ट्विस्ट

‘याला धमकी समजली तरी चालेल’, ‘तान्हाजी’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला 'या' नेत्याने दिला इशारा
संबंधित विषय
Advertisement