‘याला धमकी समजली तरी चालेल’, ‘तान्हाजी’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला 'या' नेत्याने दिला इशारा

संभाजी ब्रिगेडकडून मिळालेल्या इशाऱ्यापाठोपाठ ​‘तान्हाजी’​​​ सिनेमाचे दिश्ग्दर्शक ओम राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.

SHARE

संभाजी ब्रिगेडकडून मिळालेल्या इशाऱ्यापाठोपाठ ‘तान्हाजी’ सिनेमाचे दिश्ग्दर्शक ओम राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा देताना आव्हाडांनी या सिनेमातील आक्षेपार्ह दृष्य वगळण्याची सूचना देखील दिग्दर्शकाला केली आहे. 

हेही वाचा-  ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात 

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल अशी मल्टीस्टारकास्ट असलेला ‘तान्हाजी: द अनसंग वाॅरियर’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाॅन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील दृष्य, भव्यदिव्य सेट आणि युद्धाचे प्रसंग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना कुणीतरी लाकूड फेकून मारताना दाखवलं आहे. 

याच दृष्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. असं दृष्य केवळ टीआरपी वाढवण्यासाठी सिनेमात घातलं आहे का? असा प्रश्न विचारत चुकीचा इतिहास प्रेक्षकांपुढं जाऊ नये म्हणून हे दृष्य सिनेमातून काढून टाकावं तसंच सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो दाखवण्यात यावा, अन्यथा सिनेमाचं प्रदर्शन होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

त्यापाठोपाठ तान्हाजी सिनेमात अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी गोष्टी घुसडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल, असं म्हणत इशारा दिला आहे.  हेही वाचा-

व्वा! पठ्ठ्या महाराजांचा गड राखलास

'तानाजी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अजय-सैफ पुन्हा भिडणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या