‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

आम्हाला चित्रपट दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं उत्तर देऊ असा इशार देण्यात आला आहे.

SHARE

अजय देवगण याचा बहुप्रतीक्षित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. संभाजी ब्रिगेडनं या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. चित्रपटामधील काही दृष्ट्यांवर त्यांनी आक्षेप घेत त्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे.

ट्रेलरमधील एका शॉटमध्ये शिवाजी महाराजांवर कोणी साधू लाकूड फेकताना दाखवला आहे. ही व्यक्ती नक्की कोण आहे? आणि हा कोणता प्रसंग आहे? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे. चुकीचा इतिहास जनतेसमोर जावू नये अशी संभाजी ब्रिगेडची इच्छा आहे. संभाजी ब्रिगेडनं हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. तसंच अभिनेत्री काजोलच्या तोंडी जे संवाद आहे तेही आक्षेपार्ह आहेत.
याशिवाय शिवाजी महाराजांची गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी चुकीची आहे. एका दृश्यामध्ये भगव्या झेंड्यावर ॐ दाखवण्यात आलं आहे. यावरून महाराज सर्वधर्मसमावेशक नव्हते असा अर्थ प्रतीत होऊ शकतो. त्यामुळे चित्रपट दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं उत्तर देऊ असा इशार देण्यात आला आहे.

हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी हा वाद वाढतो की आणखी चिघळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण बॉलिवूडमध्ये हा पहिला चित्रपट नाही ज्यावरून वाद झाला आहे. यापूर्वी पद्मावती, बाजीराव मस्तानी या चित्रपटांना देखील काहींनी विरोध दर्शवला होता.हेही वाचा

व्वा! पठ्ठ्या महाराजांचा गड राखलास


संबंधित विषय
ताज्या बातम्या