सुजॉय घोषच्या 'कहानी ३’ची स्टोरी आधीच लिक, पण 'हा' आहे ट्विस्ट

आता सुजॉय घोष 'कहानी ३' घेऊन यायच्या विचारात आहे. एवढंच नाही तर त्यानं 'कहानी ४'ची पण घोषणा केली.

SHARE

विद्या बालन अभिनित कहानी हा चित्रपट तुमच्या चांगला लक्षात असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होताआपल्या बेपत्ता असलेल्या नवऱ्याला शोधणाऱ्या विद्या बाग नावाच्या गरोदर महिलेची भूमिका विद्या बालननं साकारली होती. आता सुजॉय घोष 'कहानी ३घेऊन यायच्या विचारात आहे. एवढंच नाही तर त्यानं 'कहानी ४'ची पण घोषणा केली.

कहानी उघड 

कहानी चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सुजॉय घोषनं 'कहानी २' हा सीक्वेलसुद्धा आणला. सस्पेन्स थ्रिलर प्रकारचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. आता कहानीचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय की काय? असंच सुजॉय घोषच्या ट्वीट वाचून जाणवेल. या संदर्भातच सुजॉय घोषनं एक गमतीदार ट्वीट करत 'कहानी ३'ची कहाणीसुद्धा सांगितली.


उपहासपूर्ण ट्वीट

'कहानी 3 मध्ये विद्या बागची व्होडाफोनच्या नेटवर्कचा शोध घेताना दिसेल.... कदाचित यासाठी कहानी 4 असा आणखी एक भागसुद्धा निघेल...' अशा अर्थाचं उपहासपूर्ण ट्वीट सुजॉय घोषनं केलं आहे. मोबाईल नेटवर्कला कंटाळून असं उपहासात्मक ट्वीट करत सगळ्यांचीच फिरकी घेतली. त्याला नेटिझन्सनीसुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा

‘याला धमकी समजली तरी चालेल’, ‘तान्हाजी’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला 'या' नेत्याने दिला इशारा

‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात


संबंधित विषय
ताज्या बातम्या